माझ्याबद्दल

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो !!!

मी बँकिंग अँड फायनान्स क्षेत्रात कार्यरत असणारा, भटकंतीची आवड असणारा तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य प्राणी.
महाराष्ट्रात राहून शिवरायांची आणि किल्ल्यांची ओढ नाही अश्या व्यक्ती फार क्वचितच सापडतील.इयत्ता चौथीच्या शिवरायांच्या शाळेतल्या पुस्तकांपासून शिवरायांची आणि किल्याची ओढ लागली ती कायमचीच आणि मग काय ट्रेक्स चे वेड लागले आणि नुसते ट्रेक करून फायदा नाही ,तर जिथे जाईल तिथली भौगोलिक, तसेच ऐतिहासिक माहिती अवगत करायला हवी , नव्हे अवगत करून सर्वांपर्यंत पोहोचवायला हवी हे मला वाटले. माझी वेबसाईट हि ह्या माझ्या उद्देशाचाच एक भाग.माझा उद्देश नुसत्या किल्ल्यांचीच माहिती देणे नसून त्याच प्रमाणे प्राचीन मंदिरे , बारवा ह्यांचा पण जणमाणसांपर्यंत प्रसार व्हावा हा आहे.त्याच बरोबर ससंदर्भ इतिहास जो मला माहित आहे तसेच विविध तज्ज्ञ व्यक्तींकडून जो मला समजला आणि जो मी वाचला त्याची ओळख करून देणे मला क्रमप्राप्त वाटते.मला प्रवासाची आवड असल्याने विविध पर्यटन स्थळांची माहिती मग ती भारतातील आणि भारताबाहेरील असो त्याचा माझ्या ब्लॉग मध्ये समावेश असेल.२०२४ च्या २१ व्या गिरिमित्र संमेलनात माझ्या ब्लॉग ला प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

माझे लिखाण कसे वाटले यावर अभिप्राय नक्की कळवा.आणि सह्याद्रीचे तसेच मराठ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या ह्या मातीचे वेड तुम्हा सर्वांनाहि लागो हि शुभेच्छा!!!.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित – @ मेघन पेटकर- rockpachh@gmail.com