चांदवड रेंज ट्रेक भाग १ [किल्ले कंचना ,मंचना आणि राजधेर- Kanchana ,Manchana And Rajdher Fort]

निजामशाही पासून ते आदिलशाही आणि  मुघलांपर्यंत  ज्या पट्ट्यात आणि मुख्यतः शिवकाळात खूप साऱ्या घडामोडी जेथे घडल्या तो पट्टा म्हणजे नाशिक-बागलाण चा. ह्याच नाशिकच्या थोडं  पुढे चांदवड भागातील डोंगराळ भागात उत्तमोत्तम किल्ले आजही आपल्या अस्तित्वासह दिमाखात उभे आहेत.त्यातील ५ किल्ल्यांची सफर मी येणाऱ्या २ किंवा ३ भागात मांडणार आहे.नेहमीप्रमाणे ट्रेकक्षितिज सोबत डोंबिवलीहून प्रवासाला सुरुवात करून पहिले दोन जोड किल्ले कंचना आणि … Continue reading चांदवड रेंज ट्रेक भाग १ [किल्ले कंचना ,मंचना आणि राजधेर- Kanchana ,Manchana And Rajdher Fort]

सुळक्यांचा राजा किल्ले माहुली (Mahuli Fort)

ट्रेकर्स म्हणा किंवा मुंबई हुन कल्याण मार्गे नाशिकला जाणारे सर्व गडप्रेमी म्हणा जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला आसनगाव जवळ यायला लागले कि एक लांब डोंगर रांग दिसते आणि  विशेष म्हणजे त्या डोंगर रांगेत ३ ते ४ सुळके आपले लक्ष वेधून घेतात.हे सुळके आहेत इतिहासात प्रसिद्ध असलेल्या स्वराज्याचे  संकल्पक  शाहजीराजे भोसले , मासाहेब जिजाबाई व शिवाजी राजे ह्यांचे वास्तव्य … Continue reading सुळक्यांचा राजा किल्ले माहुली (Mahuli Fort)

दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग -३ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part 3)

मागच्या भागात मी कुशावर्त तलावापर्यंत माहिती दिलेली.आता वळूयात पुढील रायगड दर्शनाकडे. कुशावर्त तलाव पाहून पुन्हा होळीच्या माळावर आलो.होळीच्या माळाच्या समोरच छोट्या खोल्यांचे अवशेष दुतर्फा लांबवर पसरलेले आहेत हीच ती रायगडाची प्रसिद्ध बाजारपेठ जिला हुजूर बाजार पण म्हणतात.दोन्ही रांगांमध्ये प्रत्येकी २२ दुकाने आहेत.ह्यातील एका दुकानाच्या खांबावर नाग शिल्प आहे.प्रत्येक दुकानाचे बांधकाम हे सामान आहे कुठेही एकदम मोठे … Continue reading दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग -३ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part 3)

दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग -२ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part 2)

पहिल्या भागात मी म्हंटल्याप्रमाणे पालखी दरवाजा पाहून सरळ पायऱ्या चढून वर आल्यावर आपण गडावरच्या महत्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या भागात पोहोचतो.सर्वात पहिले लागते ते राणीवशा अर्थात राण्यांचे महाल. गडावर ४ राण्यांचे महाल आहेत त्यापैकी एक हा महाराणी येसूबाई साहेबांचा जो कि उजवीकडून  शेवटचा अर्थात ४था महाल.आणि पहिले ३ महाल हे अनुक्रमे महाराणी सोयराबाई ,  महाराणी पुतळाबाई व महाराणी सकवारबाई … Continue reading दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग -२ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part 2)

दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग १ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part1)

भरपूर दिवसाच्या विश्रामानंतर योग आला तो मराठ्यांचे सर्वस्व असलेला किल्ले रायगड अर्थात मराठ्यांची दुसरी राजधानी पाहण्याचा आणि तेही ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री.अप्पा परब ह्यांच्या समवेत.मी रायगड ह्या आधीही पाहिला होता परंतु कुठल्याही प्रकारची माहिती न घेता आणि तेही रोप वे ने. त्यामुळे बरेच दिवस मनात होते कि पूर्ण रायगड पाहायचा अगदी ईत्तमभूत माहिती घेऊन. डोंबिवलीहून … Continue reading दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग १ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part1)