ब्लॉग

दुर्लक्षित किल्ले सिंदोळा

माळशेज - जुन्न्नर-नगर पट्टा हा बेलाग दुर्गांनी वेढला आहे. इथे दिमाखाने उभे असलेले डोंगर त्यांच्या राकटपणाची साक्ष आपणास देतात. माळशेजचा पुढचा भाग हरिश्चंद्रगड , तसेच नाणेघाट ह्यांमुळे खूप प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्रगडाच्या प्रसिद्धीमुळे वर उल्लेख केलेल्या पट्ट्यात असणारा एक किल्ला हा जवळ जवळ विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे. काही किल्ल्यांवर महत्वाच्या घटना न घडल्याने ते दुर्लक्षित होतात … Continue reading दुर्लक्षित किल्ले सिंदोळा

किल्ले सागरगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली हे आपणास सर्वश्रुत आहे. पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंनी मराठा आरमाराच्या पराक्रमाचा कळस केला. इंग्रज , पोर्तुगीझ , सिद्धी , फ्रेंच सर्वांना जेरीस आणण्याचे काम सरखेल आंग्रेंनी केले.महाराष्ट्राला लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी खांदेरी ,सिंधुदुर्ग , कुलाबा सारखे किल्ले बांधलेच परंतु , काही किल्ल्यांची पुनर्रचना केली. महाराजांच्या गडकोटांनी … Continue reading किल्ले सागरगड