बेळगावातील मध्यवर्ती भागातील जुन्या हनुमान मंदिराच्या बाजूला असणाऱ्या दुमजली इमारतीत मुक्काम करून दुसऱ्यादिवशी आम्ही सडा किल्ला पाहायला निघालो.ज्या मंदिरात मुक्काम केला ते मंदिर संपूर्णतः लाकडी व बघण्यासारखे आहे . मंदिरातील मारुतीची मूर्ती पण सुंदर आहे.असो सकाळी ८.३० च्या सुमारास बेळगाव वरून सडा किल्ल्यास जायला प्रस्थान केले.सडा किल्ला बेळगाव पासून ५९ किलोमीटर अंतरावर आहे.किल्ल्याकडे जाताना लालबुंद मातीतील कच्या रस्त्याने प्रवास … Continue reading दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग ३ ((South Entrance Belgaum Range Trek Part-3)
ब्लॉग
दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग २ (South Entrance Belgaum Range Trek Part-2)
बेळगाव भागातील पहिल्याच दिवसात ३ किल्ले पाहून झालेले आणि ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे चौथ्या किल्ल्यासाठी संध्याकाळी ४.०० च्या सुमारास प्रस्थान केले ते येळ्ळूर चा किल्ला अथवा राजहंसगडाकडे. काकती किल्ल्यापासून राजहंसगड ४० किलोमीटर अंतरावर आहे.गाडी रस्त्याने थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते.सुमारे पाऊण तासाने आम्ही सर्व किल्ल्यापाशी पोहोचलो.आणि सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते किल्ल्याची अप्रतिम तटबंदी आणि भक्कम बुरुजांनी.किल्ल्याची तटबंदी आणि … Continue reading दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग २ (South Entrance Belgaum Range Trek Part-2)
दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग १ (South Entrance Belgaum Range Trek Part-1)
दक्षिणेचे प्रवेशद्वार नक्की कुठले ह्याची मला कल्पना नाही परंतु बेळगावचे भौगोलिक स्थान आणि तेथील आसपासच्या किल्ल्यांचे स्थान बघता बेळगाव ला दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणायला हरकत नाही असे वाटते. बेळगाव च्या रेंज मध्ये ६ किल्ले पाहण्याचा योग आला.किल्ले अतिशय आटोपशीर परंतु पाहण्यासारखे आहेत .हे सर्व किल्ले पाहताना मी कायम महामार्गांवरच फिरलो असे वाटले कारण सर्व किल्ल्यांना जायचा मार्ग हा महामार्गांना … Continue reading दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग १ (South Entrance Belgaum Range Trek Part-1)
नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग – २ (Nashik Unknown Route FortsTrek Part-2)
भिलाईच्या वेगळ्या घसरड्या अनुभवानंतर आम्ही थकलेले सर्व जीव पुन्हा अंगात त्राण आणून निघालो दिवसातल्या शेवटच्या किल्ल्याकडे म्हणजे प्रेमगिरी किल्ल्याकडे.प्रेमगिरी साठी कळवण गावापासून ५ किलोमीटर वर असणारे एकलहरे गाव गाठायचे. पेमगिरी आणि प्रेमगिरी हे दोन्हीही वेगळे किल्ले आहेत ह्याची नोंद घ्यावी.संध्याकाळच्या ५.१५ वाजता आम्ही आशेने हा किल्ला चढून अंधारातच खाली उतरावे लागेल ह्या तयारीनेच निघालो.परंतु आमचे दुर्दैव … Continue reading नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग – २ (Nashik Unknown Route FortsTrek Part-2)
नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग १ (Nashik Unknown Route FortsTrek Part-1)
गुलशनाबाद म्हणजे अर्थात आपले नाशिक!!! नाशिक हा सुद्धा डोंगर आणि पर्वत रांगांनी समृद्ध असा प्रदेश.ह्याच पट्ट्यात बरेचसे महत्वाचे किल्ले येतात परंतु ह्यातील पण सटाणा पासून आत आडवाटेवर अनेक किल्ले आहेत जिथे शक्यतो कोणी जात नाही.ह्याच आडवाटेवरील पट्ट्यातील ४ किल्ले करण्याची मला संधी लाभली तीही मस्त थंडीत. तापमान जास्त असे काही नव्हते फक्त ३ अंश सेल्सिअस!!! असो ते … Continue reading नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग १ (Nashik Unknown Route FortsTrek Part-1)