ब्लॉग

कोल्हापूर रेंज ट्रेक भाग – ३ (Kolhapur Range Trek Part-3)

कोल्हापूर पट्ट्यातल्या आणखी ३ किल्ल्यांची सफर आपण मागील भागात केली आता वळूयात कोल्हापूर पट्ट्यातील ट्रेक मधल्या शेवटच्या २ किल्य्यांकडे. पारगड पाहून सकाळी ९ वाजता आम्ही कलानिधी गडाकडे निघालो ज्याला कलानंदीगड असे पण म्हणतात कारण ह्या किल्ल्याचा आकार बसलेल्या नंदीसारखा दिसतो म्हणून. महाराष्ट्राचे लाडके लेखक पु.ल.देशपांडे ह्यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते आणि त्यांचे पूर्वज गडाचे किल्लेदार … Continue reading कोल्हापूर रेंज ट्रेक भाग – ३ (Kolhapur Range Trek Part-3)

कोल्हापूर रेंज ट्रेक भाग २ (Kolhapur Range Trek Part-2)

मागील भागात मी कोल्हापूर रेंज मधल्या रांगणा व भुदरगड विषयी सांगितले आता पुढे जाऊयात सामानगडाकडे. भुदरगडाहून सामानगड ४४ किलोमीटर वर आहे.गडहिंग्लज मार्गे चिंचेवाडी गाठून मग सामानगडावर जाता येते.किल्ल्याचा आवाका बघता आणि किल्ल्यावर असणाऱ्या पाण्याच्या आणि धान्य दारुगोळा साठवण्याच्या क्षमतेवरून किल्ल्याचे नाव योग्य वाटते.मी तर ह्या किल्ल्याला विहिरींचा गडचं म्हणेल,कारण किल्ल्यावर अप्रतिम अशा मोठमोठ्या विहिरी आहेत.असो, स्वतःच्या … Continue reading कोल्हापूर रेंज ट्रेक भाग २ (Kolhapur Range Trek Part-2)

कोल्हापूर रेंज ट्रेक भाग-१ (Kolhapur Range Trek Part-1)

करवीर अर्थात कोल्हापूर जे ओळखले जाते महाराष्ट्रातल्या बहुतांश मराठी माणसाची कुलदेवी असलेली अंबाबाईच्या मंदिरामुळे , तसेच रंकाळा तलाव, ज्योतिबाचा डोंगर  किंवा स्वराज्याच्या दृष्टीने बलशाली अशा आणि ज्याने मराठ्यांचा इतिहास पाहिलाच असे नाही तर तो त्याच्या मनावर कोरला त्या पन्हाळा किल्ल्यामुळे. अशा ह्या कोल्हापूर पट्ट्यातील ७ किल्ले पाहण्याची सुवर्ण संधी मला आली आणि मग काय आपण थोडी … Continue reading कोल्हापूर रेंज ट्रेक भाग-१ (Kolhapur Range Trek Part-1)

सांगली रेंज ट्रेक -भाग २(Sangli Range Trek-Part2)

माझ्या मागील ब्लॉग मधे सांगली रेंज ट्रेक मधील ३ किल्ल्यांची सफर आपण केली ,आता वळूया पुढील उर्वरित ३ किल्ल्यांकडे. पहिल्या दिवशी ३ किल्ले करून आम्ही सर्व रात्री ७.३० ते ८.००  च्या सुमारास थकलेल्या अवस्थेत साधारण ५००-६०० पायऱ्या चढून सदाशिव गडाचा माथा गाठला तेही बॅगेच्या ओझ्या सकट. पण हि आताच्या काळात बांधलेली पायऱ्यांची वाट थकवणारी असली तरी त्यात … Continue reading सांगली रेंज ट्रेक -भाग २(Sangli Range Trek-Part2)

सांगली-कराड रेंज ट्रेक भाग १ (Sangli Range Trek Part-1)

थंडी म्हंटली कि ट्रेकर्स साठी सुगीचे दिवस !!!कारण ह्या दिवसात सर्व ट्रेकर्स जास्तीत जास्त ट्रेक्स करतात ते म्हणजे गुलाबी थंडी आणि पोषक वातावरणामुळे.मला ह्या दिवसात रेंज ट्रेक करायला खूप आवडते आणि ती एक पर्वणी असते माझ्या साठी .माझ्या ह्या वर्षीच्या थंडीतल्या रेंज ट्रेक ची सुरुवात होणार होती ती सांगली - कराड ह्या पट्ट्यातल्या ६ किल्ल्यांनी. हा ट्रेक … Continue reading सांगली-कराड रेंज ट्रेक भाग १ (Sangli Range Trek Part-1)