दक्षिणेचे प्रवेशद्वार नक्की कुठले ह्याची मला कल्पना नाही परंतु बेळगावचे भौगोलिक स्थान आणि तेथील आसपासच्या किल्ल्यांचे स्थान बघता बेळगाव ला दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणायला हरकत नाही असे वाटते. बेळगाव च्या रेंज मध्ये ६ किल्ले पाहण्याचा योग आला.किल्ले अतिशय आटोपशीर परंतु पाहण्यासारखे आहेत .हे सर्व किल्ले पाहताना मी कायम महामार्गांवरच फिरलो असे वाटले कारण सर्व किल्ल्यांना जायचा मार्ग हा महामार्गांना … Continue reading दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग १ (South Entrance Belgaum Range Trek Part-1)
Category: ट्रेकिंग
Information of Forts which visited via Treks.गडकोट आणि किल्ल्यांची माहिती
नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग – २ (Nashik Unknown Route FortsTrek Part-2)
भिलाईच्या वेगळ्या घसरड्या अनुभवानंतर आम्ही थकलेले सर्व जीव पुन्हा अंगात त्राण आणून निघालो दिवसातल्या शेवटच्या किल्ल्याकडे म्हणजे प्रेमगिरी किल्ल्याकडे.प्रेमगिरी साठी कळवण गावापासून ५ किलोमीटर वर असणारे एकलहरे गाव गाठायचे. पेमगिरी आणि प्रेमगिरी हे दोन्हीही वेगळे किल्ले आहेत ह्याची नोंद घ्यावी.संध्याकाळच्या ५.१५ वाजता आम्ही आशेने हा किल्ला चढून अंधारातच खाली उतरावे लागेल ह्या तयारीनेच निघालो.परंतु आमचे दुर्दैव … Continue reading नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग – २ (Nashik Unknown Route FortsTrek Part-2)
नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग १ (Nashik Unknown Route FortsTrek Part-1)
गुलशनाबाद म्हणजे अर्थात आपले नाशिक!!! नाशिक हा सुद्धा डोंगर आणि पर्वत रांगांनी समृद्ध असा प्रदेश.ह्याच पट्ट्यात बरेचसे महत्वाचे किल्ले येतात परंतु ह्यातील पण सटाणा पासून आत आडवाटेवर अनेक किल्ले आहेत जिथे शक्यतो कोणी जात नाही.ह्याच आडवाटेवरील पट्ट्यातील ४ किल्ले करण्याची मला संधी लाभली तीही मस्त थंडीत. तापमान जास्त असे काही नव्हते फक्त ३ अंश सेल्सिअस!!! असो ते … Continue reading नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग १ (Nashik Unknown Route FortsTrek Part-1)
कोल्हापूर रेंज ट्रेक भाग – ३ (Kolhapur Range Trek Part-3)
कोल्हापूर पट्ट्यातल्या आणखी ३ किल्ल्यांची सफर आपण मागील भागात केली आता वळूयात कोल्हापूर पट्ट्यातील ट्रेक मधल्या शेवटच्या २ किल्य्यांकडे. पारगड पाहून सकाळी ९ वाजता आम्ही कलानिधी गडाकडे निघालो ज्याला कलानंदीगड असे पण म्हणतात कारण ह्या किल्ल्याचा आकार बसलेल्या नंदीसारखा दिसतो म्हणून. महाराष्ट्राचे लाडके लेखक पु.ल.देशपांडे ह्यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते आणि त्यांचे पूर्वज गडाचे किल्लेदार … Continue reading कोल्हापूर रेंज ट्रेक भाग – ३ (Kolhapur Range Trek Part-3)
कोल्हापूर रेंज ट्रेक भाग २ (Kolhapur Range Trek Part-2)
मागील भागात मी कोल्हापूर रेंज मधल्या रांगणा व भुदरगड विषयी सांगितले आता पुढे जाऊयात सामानगडाकडे. भुदरगडाहून सामानगड ४४ किलोमीटर वर आहे.गडहिंग्लज मार्गे चिंचेवाडी गाठून मग सामानगडावर जाता येते.किल्ल्याचा आवाका बघता आणि किल्ल्यावर असणाऱ्या पाण्याच्या आणि धान्य दारुगोळा साठवण्याच्या क्षमतेवरून किल्ल्याचे नाव योग्य वाटते.मी तर ह्या किल्ल्याला विहिरींचा गडचं म्हणेल,कारण किल्ल्यावर अप्रतिम अशा मोठमोठ्या विहिरी आहेत.असो, स्वतःच्या … Continue reading कोल्हापूर रेंज ट्रेक भाग २ (Kolhapur Range Trek Part-2)